Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » ट्रम्प यांच्याबाबत पाकिस्तान आशादायी!

ट्रम्प यांच्याबाबत पाकिस्तान आशादायी!

donald-trumpइस्लामाबाद, [१० नोव्हेंबर] – काश्मीर मुद्यावरून भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भूमिकेचे पाकिस्तानने स्वागत केले आहे. ट्रम्प यांनी भारत-पाक दरम्यान मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज गुरुवारी माध्यमांनी ट्रम्प यांच्या या विधानाबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयातील प्रकक्ते नफीस झकेरिया यांनी ट्रम्प यांच्याबाबत पाकिस्तान आशा बाळगून असल्याची प्रतिक्रिया दिली.
झकेरिया म्हणाले, आम्हाला अमेरिकेसोबत स्नेहाचे संबंध हवे आहेत. हे संबंध आणखी कसे बळकट करता येतील, त्याबाबत आम्ही आशावादी आहोत.
ऑक्टोबर महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये भारत-पाक यांच्या दरम्यान मध्यस्थी करण्याबाबत इच्छा जाहीर केली होती. मी जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळित करू शकलो, तर तो मी माझा सन्मानच समजेन. दोन्ही देशांची इच्छा असल्यास मी मध्यस्थ म्हणून काम करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन त्यांनी या मुलाखतीत केले होते.

३ हजारांवर शीख भाविकांना व्हिसा
पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाने आज गुरूवारी ३ हजारावर शीख भाविकांना व्हिसा मंजूर केला. आमच्या या निर्णयाने ‘धार्मिक पर्यटना’ला चालना मिळेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. गुरू नानक देवजी यांच्या जयंती सप्ताहानिमित्त १२ ते २१नोव्हेंबर या कालवधीसाठी हे व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. गुरू नानक देवजी यांचे जन्मस्थळ पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधील नानकाना साहिब येथे आहे.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google