Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ट्रम्प यांना अर्थशास्त्राची जाण नाही; अर्थतज्ज्ञांचे मत

ट्रम्प यांना अर्थशास्त्राची जाण नाही; अर्थतज्ज्ञांचे मत

donald_trumpवॉशिंग्टन, [३ नोव्हेंबर] – अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी लोकांना रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मते देऊ नये, असे आवाहन केले आहे. यामधील अनेक अर्थतज्ज्ञ प्राध्यापक आहेत, तर अनेकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ट्रम्प यांना अर्थव्यवस्थेची कोणतीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते विश्‍वसनीय अर्थतज्ज्ञांचे ऐकतही नाहीत. मतदारांनी डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिटंन यांना मतदान करावे असे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. फक्त ट्रम्प समर्थकांनी इतर कोणालाही मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ट्रम्प यांनी इतर देशांसोबत सुरू असलेला व्यापार, उत्पादन, इमिग्रेशन आणि सरकारी संस्थांबाबत लोकांना चुकीची माहिती दिली असल्याचे या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी प्रचारादरम्यान मेक्सिको आणि चीनमधून आयातीवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा मुद्दा मांडला होता. तसेच नाफ्टासारख्या मुक्त व्यापार करार संपवणार असल्याचेही मत मांडले होते.
ट्रम्प यांच्या धोरणाने ४० लाख रोजगार जातील
चीन-मेक्सिकोमधून आयातीवर जास्त शुल्क वाढवल्यास हे देश देखील असाच निर्णय घेतील. त्याचा परिणाम म्हणून ट्रेड वॉर सुरू होईल. चीन आणि मेक्सिको अमेरिकेचे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे ट्रेड भागीदार आहेत. त्यांची सर्व धोरणे लागू झाल्यास चार वर्षांत अर्थव्यवस्थेला एक लाख कोटी डॉलरचे नुकसान होईल. ४० लाख रोजगार देखील जातील.
हिलरींवरही टीका
सप्टेंबरमध्ये ३०० पेक्षा जास्त अर्थतज्ज्ञांनी एक पत्र प्रसिद्ध करून क्लिटंन यांचे धोरण देशासाठी योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांचे पेट्रोल-डिझेलविरोधी ऊर्जा धोरण आणि कर योजना, तसेच कमीत कमी पगारात वाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली. असे असले तरी ऑक्सफर्ड अर्थतज्ज्ञांनी हिलरी यांचे हे मॉडेल चांगले असल्याचे सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 4 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google