Home » छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » डीयू, जेएनयूच्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल

डीयू, जेएनयूच्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल

=आदिवासी गावकर्‍याची हत्या=
nandini-sunderरायपूर, [८ नोव्हेंबर] – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गावात एका आदिवासी गावकर्‍याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी काही नक्षलवाद्यांसोबतच दिल्ली विद्यापीठ (डीयू) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) काही प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ज्या प्राध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे, त्या दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापक नंदिनी सुंदर, जेएनयूच्या अर्चना प्रसाद, दिल्लीतील जोशी अधिकार संस्थानचे विनीत तिवारी, छत्तीसगडच्या सीपीआय (मार्क्स)चे प्रदेश सचिव संजय पराते आणि अन्य काही नक्षल्यांचा समावेश आहे.
श्यामनाथ बघेल असे नाव असलेल्या आदिवासी गावकर्‍याची नुकतीच हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पत्नीने शनिवारी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या आधारावर या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्यांच्याविरोधात भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
आम्ही तपास सुरू केला असून, यात जे दोषी आढळून येतील, त्यांच्याविरोधात अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कुमाकोलेंग ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्‍या नामा गावातील शामनाथ बघेल आणि अन्य काही नागरिक गेल्या काही महिन्यांपासून नक्षली चळवळीविरोधात आंदोलन करीत होते. शुक्रवारी रात्री काही नक्षलवादी बघेल यांच्या घरात घुसले आणि त्यांना जंगलात नेले. तिथेच त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या केली होती.
म्हणून तुम्हाला मृत्युदंड
शामनाथ बघेल  यांना जंगलात नेले असता मी देखील त्यांच्या पाठोपाठ तिथे गेली. जंगलात नक्षल्यांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि  नंदिनी सुंदर, अर्चना प्रसाद व इतरांचे तुम्ही ऐकत नसल्याने त्यांच्याच आदेशावरून आम्ही तुम्हाला ठार मारत आहोत, असे नक्षलवादी त्यांना सांगत होते. त्यांचे बोलणे मला स्पष्टपणे ऐकू येत होते, असे शामनाथ यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
जेएनयू पुन्हा वादात
नक्षल्यांकडून झालेल्या आदिवासीच्या हत्येत देशविरोधी कारवायांसाठी आधीच वादग्रस्त असलेल्या जेएनयूमधील प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या विद्यापीठातील काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे देशविरोधी शक्तींशी संबंध आहे काय, असा प्रश्‍न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google