Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष

donald-trump-newन्यूयॉर्क, [९ नोव्हेंबर] – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू होईपर्यंत हिलरी यांचे पारडे जड मानले जात असताना सर्व अंदाज फोल ठरवत ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’ गाठण्याचे स्वप्न साकारले. ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेला ४५ वे अध्यक्ष मिळाले असून ७० वर्षीय ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
ट्रम्प यांनी या विजयानंतर आपण प्रत्येक अमेरिकन नागरिकाचा राष्ट्राध्यक्ष आहे, असे नमूद करत ‘मेक अमेरिका, ग्रेट अमेरिका’ हा आपला संकल्प पुन्हा एकदा बुलंद केला.
बराक ओबामा यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी हिलरी क्लिंटन या डेमॉक्रेटिक पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. २४० वर्षांच्या इतिहासात हिलरी यांच्या रूपाने अमेरिकेला पहिला महिला अध्यक्ष मिळेल, असेही बोलले जात होते. मतदान झाल्यानंतरही हिलरी यांचेच पारडे जड असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला पण प्रत्यक्षात आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी सगळ्या भाकितांना फाटा मिळाला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ट्रम्प आणि हिलरी यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळाली पण नंतर ट्रम्प यांनी हिलरी यांच्यावर आघाडी घेतली. ट्रम्प यांची आघाडी हिलरी यांना मोडता आली नाही. अध्यक्षपदी विजय मिळवण्यासाठी २७० इलेक्टोरल कॉलेजेसचा कौल (मतदार मंडलं) आवश्यक होता. ट्रम्प यांनी २७ राज्यांमधून २७६ इलेक्टोरल मतं मिळवून हा टप्पा ओलांडला. हिलरी यांना २१८ इलेक्टोरल मतांपर्यंतच मजल मारता आली.
यशस्वी उद्योजक म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या ट्रम्प यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्यापासूनच अनेक वाद निर्माण झाले होते. त्यात महिला, मुस्लिम समाज यांच्याबाबत केलेल्या विधानांनीही ते वादग्रस्त ठरले होते. मात्र त्यानंतरही लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद मिळवले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक नवी समीकरणे तयार होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या निकालाचे पडसाद उमटणार असे जाणकारांचे मत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google