Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » … तर अण्वस्त्राचा प्रथम वापर करू

… तर अण्वस्त्राचा प्रथम वापर करू

=पर्रीकर यांचे व्यक्तिगत मत=
manohar-parrikar_99मुंबई, [११ नोव्हेंबर] – अण्वस्त्रांचा सर्वप्रथम वापर न करण्याचा भारताचा सिद्धांत आहे आणि त्यावर आपले सरकार ठाम आहे. पण, राष्ट्रीय हित जोपासण्यासाठी गरज भासल्यास भारताने हा सिद्धांत बाजूला सारायला काहीच हरकत नाही, असे व्यक्तिगत मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले.
माझे हे स्वत:चे मत आहे. सरकार किंवा संरक्षण मंत्रालयाचे नाही. त्यामुळे कोणीही माझ्या मताचा विपर्यास करू नये, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. भारत एक जबाबदार अण्वस्त्रसज्ज देश असून, अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर होणार नाही, असे त्यांनी सांगितले. निवृत्त ब्रिगेडियर गुरमीच कंवल यांच्या ‘द न्यू अर्थशास्त्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पर्रीकर बोलत होते.
भारत सर्वप्रथम अण्वस्त्राचा वापर करणार नाही, असा सिद्धांतच तयार करण्यात आला आहे. मला यात अडकून बसायचे नाही. गरज पडली तर भारतानेही पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करायला हवा, असे मला मनापासून वाटते, असे ते म्हणाले.
माझे हे व्यक्तिमत मत आहे. त्यामुळे त्याचा विपर्यास होऊ नये आणि संरक्षण मंत्र्यांनीच भारताच्या आण्विक धोरणात बदल केला, असा अर्थही त्यातून काढू नका, असे त्यांनी सांगितले. भारताकडून धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, अशी धमकी पाकिस्तानकडून सातत्याने मिळत आहे. पण, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकच्या धमक्या बंद झाल्या, असा दावाही पर्रीकर यांनी केला.
अण्वस्त्रांबाबतचा सिद्धांत
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात भारताने १९९८ मध्ये एकामागोमाग पाच अणुचाचण्या केल्या होत्या. यानंतर भारताने अण्वस्त्रांच्या वापराबाबत ‘नो फर्स्ट यूज’ सिद्धांत स्वीकारला होता. यानुसार, एखादा देश भारताविरोधात अण्वस्त्राचा वापर करीत नाही, तोपर्यंत भारतही त्यांचा वापर करणार नाही. हा सिद्धांत रासायनिक व जैविक शस्त्रांकरिताही लागू आहे. पाकने मात्र असे कोणतेही धोरण स्वीकारले नाही.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google