Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » … तर आम्ही भारताचे तीन जवान मारू

… तर आम्ही भारताचे तीन जवान मारू

=पाकी संरक्षण मंत्र्याची दर्पोक्ती=
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, २६ नोव्हेंबर –
khawajaasif-pakistan-defence-ministerभारतविरोधी गरळ ओकण्याचे सत्र पाकिस्तानमधील सत्ताधार्‍यांनी सुरूच ठेवले आहे. भारताने पाकचा एक सैनिक मारला, तर आम्ही भारताच्या तीन जवानांना ठार मारू, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी केली.
शुक्रवारी पाकच्या संसदेत बोलताना असिफ म्हणाले की, निवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत सरकार जाणीवपूर्वक तणाव निर्माण करीत आहे. पाकमधील दहशतवादामागे भारताचा हात असून, त्यासंदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत. या पुराव्यांची कागदपत्रे आणि व्हिडीओ आम्ही संयुक्त राष्ट्राकडे पाठवली असून, इतर देशांना पाकमधील दहशतवादामागे भारताचाच हात असल्याचे आम्ही दाखवून देणार आहोत. भारताचे जवान वारंवार संघर्षविरामाचे उल्लंघन करून आमच्या सैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना ठार मारत आहेत. आम्ही प्रत्युत्तर देऊ आणि एका सैनिकाच्या मोबदल्यात भारताच्या तीन जवानांना ठार मारू.
चीन आणि पाकमधील आर्थिक संबंधांत भारत असंख्य अडचणी निर्माण करीत आहे, असा आरोपही असिफ यांनी केला. आज जरी पाकिस्तान भारताच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असला, तरी चीनसोबतच्या काही आर्थिक प्रकल्पांमुळे इस्लामाबाद अधिक मजबूत होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google