Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » …तर बीपीएल कार्डधारकांना फटका

…तर बीपीएल कार्डधारकांना फटका

वृत्तसंस्था
मुंबई, १५ नोव्हेंबर –
ration-cardपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काळा पैसा बाळगणार्‍यांची धावाधाव सुरू आहे. ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या शक्कल  लढवत आहेत. अडीच लाखांची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्याबाबतची कोणतीही चौकशी होणार नाही. मात्र त्यावरील रकमेची चौकशी करू, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे मोठी रक्कम जवळ असलेले लोक इतरांच्या खात्यावर जमा करत आहेत.
मात्र, याचा फटका दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना म्हणजेच बीपीएल कार्डधारकांना बसू शकतो. बीपीएलधारकांनी त्यांच्या खात्यात ३९ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास त्यांचे कार्ड रद्द होऊ शकते. कारण ज्यांचे वार्षिक उत्पन्न १२ हजारांच्या आत आहे, त्यांनाच या कार्डाचा लाभ मिळतो. यामध्ये सलग तीन वर्ष जर तुमचे उत्पन्न १२ हजारांपेक्षा जास्त म्हणजे ३६ हजारांपेक्षा जास्त असेल, तर तुमचे नाव दारिद्र्य रेषेखालून आपोआप रद्द होईल.
त्यामुळे बीपीएल धारकाच्या खात्यात जर ३९ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास, त्याचा फटका आपोआप कार्डधारकाला बसण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google