Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » तिच्या चहासाठी जग वेडे झाले!

तिच्या चहासाठी जग वेडे झाले!

uppamma-virdiनवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] – निळ्या रंगाचे डोळे असलेला पाकिस्तानचा चहावाला अर्शद खान आणि ढाक्याची भाजी विकणारी तरुणी यांच्या सोशल नेटवर्किंग साईट्‌सवरील छायाचित्रांची धूम सुरू असतानाच आता एका भारतीय तरुणीची यात भर पडली आहे. उप्पम्मा विर्दी असे या तरुणीचे नाव असून, तिच्या हातच्या चहासाठी ऑस्ट्रेलियातील लोक अक्षरश: वेडे झाले आहेत.
मूळची पंजाबच्या चंदीगडची असलेल्या विर्दीला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील एका कार्यक्रमात यावर्षीचा ‘बिझनेस वुमेन ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती अवघ्या २६ वर्षांची असून, उप्पम्माची ओळख केवळ एक चहावाली म्हणून नव्हे, तर कॉर्पोरेट वकील म्हणूनही ती लोकप्रिय आहे.
तिला काही दिवसांपूर्वी एका टेलिव्हीजन चॅनेलला मुलाखतीसाठी बोलावले असता, ती चक्क चहाची केटली व ग्लास घेऊन पोहोचली. ती बहुदा मस्करी करीत असावी असे तिथे उपस्थितांना वाटले. मात्र, तिने उपस्थितांना मसाला चहाविषयी माहिती दिली आणि सारेच अवाक् झाले.
उप्पम्मा गेल्या दोन वर्षांपासून चहाचा व्यवसाय करीत असून, विशेषत: ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. सोबतच, तिने आपले कॉर्पोरेट वकिलीचे कामही सुरू ठेवले आहे. विर्दीचे आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते मसाल्यांचे तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. तिच्या अजोबांकडून मिळालेला हा वारसा तिने जोपासला. आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. चहा हे दोन लोकांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे तिचे ठाम मत आहे.
विर्दीने चहाचा व्यवसाय सुरू केला तेव्हा तिच्या कुटुंबियांनी विरोध केला. कारण, भारतात चहावाला म्हणजे कमी दर्जाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते. माझ्या आई-वडिलांना माझ्या या व्यवसायावर आक्षेप होता. पण भारतातील प्रत्येक चहावाला एखाद्या उद्योजकाप्रमाणेच असतो. कारण, त्यांच्यामध्ये कसलेल्या उद्योजकाचे गुण असतात, असे ती सांगते.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google