Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तिहेरी तलाक प्रथा बंद करा: व्यंकय्या नायडू

तिहेरी तलाक प्रथा बंद करा: व्यंकय्या नायडू

=संसदेला विश्‍वासात घेऊनच समान नागरी कायद्याबाबत निर्णय=
venkaiah-naidu_3हैदराबाद, [२२ ऑक्टोबर] – तिहेरी तलाक प्रथा बंद करण्याची वेळ आलेली आहे. ही प्रथा घटनाविरोधी असून न्याय, प्रतिष्ठा आणि समानता ही मूल्ये लक्षात घेता तिहेरी तलाक प्रथा बंद होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. संसदेला विश्‍वासात घेऊनच समान नागरी कायद्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट्‌स ऑफ इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. नायडू म्हणाले, सध्या देशात तिहेरी तलाकवर चर्चा सुरू आहे. आजवर या बाबत भरपूर वेळ घेण्यात आलेला आहे. आता ही प्रथा रद्द करण्याची वेळ आलेली आहे. देशातील मुस्लिम महिला देखील न्यायाची मागणी करीत आहेत.
तिहेरी तलाक प्रथा ही राज्यघटना, कायदे, लोकशाहीची तत्त्वे आणि संस्कृती यांच्याविरोधात आहे. स्त्री-पुरुषविषयक भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी ही प्रथा बंद झाली पाहिजे. देशात कुठल्याही पद्धतीचा लैंगिक भेदभाव असता कामा नये. लैंगिक समानतेची आज गरज आहे. राज्यघटनेपुढे सारेच समान आहेत. धर्म, जाती, पंथ आणि प्रदेश यांचा विचार न करता महिलांना न्याय मिळणे आवश्यक आहे. देश म्हणून पुढे जाण्यासाठी हे गरजेचे आहे.
केंद्र सरकारने दि. ७ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात मुस्लिमांमधील तिहेरी तलाक, ‘निकाह हलाला’ आणि बहुविवाह प्रथेस विरोध केला होता. समानता आणि धर्मनिरपेक्षता यांच्या आधारे या प्रथांची समीक्षा करण्याची विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
समान नागरी कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले, मागील दाराने समान नागरी कायदा लागू करण्याचा दुष्प्रचार सध्या करण्यात येत आहे. केंद्र सरकार पारदर्शकता ठेऊनच या विषयी निर्णय घेणार आहे. संसदेला विश्‍वासात घेऊन निर्णय होईल.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google