Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी घाला

तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी घाला

=राष्ट्रीय महिला आयोगाचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र=
national-commission-for-women-rashtriya-mahila-ayogनवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – केंद्र सरकार आणि मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या पाठोपाठ आता राष्ट्रीय महिल आयोगानेही मुस्लिम समाजातील तिहेरी तलाव आणि बहुपत्नीत्व प्रथा तत्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली आहे. ही प्रथा मुस्लिम महिलांच्या हक्कावर गदा आणणारी असल्याचे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.
तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथा घटनाबाह्य असून, त्या मुस्लिम महिला आणि मुस्लिम तरुणांशी विवाह करणार्‍या अन्य धर्मातील महिलांच्या अधिकारांसोबत तडजोड करणार्‍या आहेत. केवळ महिलांवरच नव्हे, तर त्यांच्या मुलांचेही आयुष्य अंधारात लोटणारे असल्याने या प्रथांवर तातडीने बंदी घालायलाच हवी, असे आयोगाच्या शपथपत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारने याच मुद्यावर गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात तलाकच्या मुद्यावर जी भूमिका घेतली होती, त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही आयोगाने जाहीर केले.
तलाक व बहुपत्नीत्व प्रथेविरोधात देशभरातील अनेक मुस्लिम महिलांनी न्यायालयात धाव घेतली असून, सार्वजनिक चर्चांमध्येही आपला विरोध व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या शपथपत्राला विरोध करण्यासाठी अ. भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुस्लिम महिला शरीयत कायद्याच्या छत्रछायेत कशा सुरक्षित आहेत, हे दाखविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतल्यानंतर मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाने या स्वाक्षरी मोहिमेचाच पंचनामा करीत, ही मोहीम महिलांची दिशाभूल करणारी आणि महिलांवर अन्याय करणारी तलाकची प्रथा कायम ठेवणारीच असल्याचा आरोप केला होता.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google