Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » तीन हजार कोटींचे मादक द्रव्य जप्त

तीन हजार कोटींचे मादक द्रव्य जप्त

♦महसूल गुप्तचर विभागाची आजवरची मोठी कारवाई
♦चित्रपट निर्माता दुधानीला अटक,
dri_drug_bust-3000crनवी दिल्ली, [२ नोव्हेंबर] – महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) राजस्थानच्या उदयपूर येथील कारखान्यात धाड घालून तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या मादक द्रव्याचा साठा जप्त केला आहे. या धाडीत २३.५ मेट्रिक टन इतके मॅण्ड्रेक्स ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चित्रपट निर्माते सुभाष दुधानीला अटक करण्यात आली. महसूल गुप्तचर महासंचालनालयाची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात मादक द्रव्याचा साठा जप्त करण्याची ही कारवाई केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी कारवाई असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर डीआरआयच्या अधिकार्‍यांनी उदयपूर येथील  मारूधर ड्रिंक्स या कारखान्यावर धाड टाकली. भारतात कायद्याने बंदी असलेल्या मेण्ड्रेक्सच्या अनेक पेट्या या कारखान्यातील एका पेटीत ठेवण्यात आल्या होत्या. मॅण्ड्रेक्स या मादक द्रवयाचा वापर पार्ट्यांमध्ये केला जातो. या मादक द्रव्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार तीन हजार कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय अबकारी व जकात मंडळाचे अध्यक्ष नजीब शाह यांनी दिली.
या प्रकरणी चित्रपट निर्माता सुभाष दुधानीला अटक करण्यात आली असून, तो मूळचा मुंबईचा आहे. चित्रपट निर्मितीसोबतच तो उद्योगपती देखील आहे. सुभाष दुधानी हाच या रॅकेटचा म्होरक्या असल्याचा दावा नजीब शाह यांनी केला.
उदयपूर येथील या कारखान्यात मोठ्या प्रमाणात मादक द्रव्य ठेवण्यात आले असल्याची माहिती महासंचालनालयाच्या मुंबई विभागाला मिळाली होती. या मादक द्रव्याची निर्मिती राजस्थानात झाले असले तरी ते विदेशात पाठवले जाणार होते, अशी शक्यता महासंचालनालयाने व्यक्त केली आहे. सौदी अरब, दुबई आणि दक्षिण आफ्रिकेसह आफ्रिका खंडांतील इतर काही देशांमध्ये हे मादक द्रव्य पाठवले जाणार होते.
दरम्यान, मागील पाच वर्षांत महासंचालनालयाने ५४० किलोपेक्षा जास्त हेरॉईन, ७,४०० किलो इफेड्रिन आणि इतर मादक द्रव्यांचा साठा जप्त केल्याच नजीब शाह यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google