Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » तोयबाच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

तोयबाच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

=शस्त्र व स्फोटकांसह दोन हजाराच्या नोटाही मिळाल्या=
वृत्तसंस्था
श्रीनगर, २२ नोव्हेंबर
india-army-2015काश्मीर खोर्‍यातील बंदीपूर भागात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास लष्करी जवानांनी भीषण चकमकीत दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले. हे दोघेही पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी होते.
बंदीपूर येथील एका घरात काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवान आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. जवानांनीही त्यास प्रत्युत्तर दिले. यावेळी झडलेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. त्यांचे आणखीही काही साथीदार लपले असण्याची किंवा जवळच्याच जंगलात पळून गेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन जवानांनी व्यापक शोधमोहीम उघडली आहे.
या अतिरेक्यांजवळून ताब्यात घेण्यात आलेल्या दस्तावेजांवरून ते पाकिस्तानचे नागरिक आणि कष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या अतिरेक्यांजवळून एके-४७ रायफल्स आणि त्याच्या जिवंत काडतुसा व स्फोटकांसोबतच भारतात नव्यानेच चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटाही आढळून आल्या आहेत. या नोटा खर्‍या की खोट्या याची शहानिशा अद्याप झाली नसली, तरी त्या अतिरेक्यांच्या हातात कशा उपलब्ध झाल्या, यावरून सुरक्षा दलाचे जवान आणि गुप्तचर यंत्रणाही आश्‍चर्यचकीत झाल्या आहेत. दोन हजारासोबतच शंभर रुपयांच्या नोटाही त्यांच्याजवळून ताब्यात घेण्यात आल्या.
सीमेवर घुसखोराचा खात्मा
अन्य एका घटनेत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला. आर. एस. पुरा सेक्टरमधून तो घुसखोरीच्या प्रयत्नात होता. जवानांनी त्याला शरण येण्याचे आदेश दिले असता, त्याने गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत तो ठार झाला.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google