Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » थेट विदेशी गुंतवणुकीत ३० टक्क्यांनी वाढ

थेट विदेशी गुंतवणुकीत ३० टक्क्यांनी वाढ

=मोदी इफेक्ट=

No caption available

No caption available

नवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात थेट विदेशी गुंतवणूक व्हावी यासाठी जगातील देशांचे दौरे केले. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. भारतात २०१६-२०१७ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ही गुंतवणूक ३० टक्क्यांनी वाढून २१.६२ अब्ज  डॉलर झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत १६.६३ अब्ज डॉलर एफडीआय गुंतवणूक झाली असे अधिकार्‍यांनी सांगितले.
एफडीआय धोरणात दिलेली मोकळीक आणि व्यवसाय करणे सोपे झाल्यामुळे ही गुंतवणूक वाढण्यास मदत झाली आहे.  संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, व्यापार, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि केमिकल या क्षेत्रांमध्ये या गुंतवणुकीचा मोठा ओघ आहे. भारताला मॉरिशस, सिंगापूर, नेदरलँड्स व जपानकडून जास्तीतजास्त गुंतवणूक मिळाली आहे. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात एफडीआय २९ टक्क्यांनी वाढून ४० अब्ज अमेरिकन डॉलरवर गेली. ही गुंतवणूक त्या आधीच्या वर्षात ३०.९३ अब्ज अमेरिकन डॉलर होती.
भारताला बंदरे, विमानतळे आणि महामार्ग या पायाभूत सुविधांना व्यापक व बळकट करण्यासाठी काही लाख कोटी डॉलर परदेशी गुंतवणूक लागेल त्यामुळे भारतासाठी अशी गुंतवणूक फार महत्त्वाची आहे. परदेशी गुंतवणूक वाढल्यामुळे देशाच्या भुगतान संतुलनाची परिस्थिती सुधारून रुपयाची शक्ती वाढवणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google