Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादविरोधी लढ्याबाबत ट्रम्पकडे नवीन कल्पना असू शकतात

दहशतवादविरोधी लढ्याबाबत ट्रम्पकडे नवीन कल्पना असू शकतात

=राममाधव  यांचे मत=
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २२ नोव्हेंबर
23Fir03.qxpअमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दहशतवादविरोधी लढ्याबाबत काही नवीन कल्पना असू शकतात, असे मत भाजपाचे सरचिटणीस राममाधव यांनी व्यक्त केले.
भारत-अमेरिका संबंधात सुरू होणार्‍या नव्या पर्वाबाबत बोलताना राममाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर गेले आहेत. आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात या संबंधांना नवी दिशा मिळणार आहे.
भारतासोबत मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध ठेवण्याचा आपला निर्धार ट्रम्प यांनी निवडणूकपूर्व भाषणांमधून अनेकदा व्यक्त केला आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच असे त्यांचे व्यक्तिमत्त्व नसल्याने त्यांच्याकडून केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच अपेक्षा आहेत. दहशतवादविरोधी लढा अधिक बळकट आणि व्यापक करण्यासाठी ते नक्कीच नव्या कल्पना सादर करतील, असा विश्‍वासही राम माधव यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारत आणि अमेरिका संबंधावर भाष्य करणारे राममाधव हे पहिलेच भाजपा नेते ठरले आहेत.
गिलगिट नेत्याने घेतली भेट
दरम्यान, पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातील एका वरिष्ठ नेत्याने राममाधव यांची भेट घेतली. भारताने आपल्या संविधानात या प्रांतातील नागरिकांसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सेंगे सेरिंग असे त्यांचे नाव असून, या भेटीत त्यांनी पाकच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मुक्ती आंदोलनाविषयी माहिती दिली. गिलगिट-बाल्टिस्थान भागातील नागरिकांना घटनात्मक हक्क नसल्याने आणि स्थानिक नागरिकत्वाचा दर्जा पाक सरकारकडून अद्याप प्रदान करण्यात न आल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी राममाधव यांचे लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google