Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » दहा महिन्यांत पाककडून ३६९ वेळा गोळीबार

दहा महिन्यांत पाककडून ३६९ वेळा गोळीबार

=राज्यसभेत सरकारची माहिती=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –
hansraj-ahirयावर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या काळात पाकिस्तानच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६९ वेळा संघर्षविरामाचे उल्लंघन केले, अशी माहिती आज बुधवारी राज्यसभेत देण्यात आली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, एकट्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकच्या सैनिकांकडून २ नोव्हेंबरपर्यंत २१० वेळा गोळीबार करण्यात आला. तर, नियंत्रण रेषेवर गोळीबाराच्या १५९ घटना घडल्या आहेत.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकी गोळीबाराच्या २५३ आणि नियंत्रण रेषेवर १५२ घटना घडल्या होत्या, असेही अहिर यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
१०५ अतिरेक्यांची घुसखोरी
अन्य एका प्रश्‍नाच्या उत्तरात अहिर यांनी सांगितले की, जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यांच्या काळात अतिरेक्यांच्या घुसखोरीचे प्रमाण तिपटीने वाढले असून, पहिल्या नऊ महिन्यात १०५ अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी केली. या काळात घुसखोरीचे एकूण २०१ प्रयत्न झाले. जवानांनी २४ अतिरेक्यांना ठार केले, तर ७२ अतिरेकी माघारी फिरले. दोन अतिरेकी शरण आले. गेल्या वर्षी केवळ ३३ अतिरेकीच देशात घुसखोरी करू शकले होते.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google