Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्लीत डिझेलवर चालणार्‍या जुन्या वाहनांवर बंदी

दिल्लीत डिझेलवर चालणार्‍या जुन्या वाहनांवर बंदी

national-green-tribune-rashtriya-harit-ayogवृत्तसंस्था
नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] –
आजपासून राजधानी दिल्लीत पंधरा वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणार्‍या जवळपास दोन लाख वाहनांना कायमस्वरूपी ब्रेक लागणार असून, अशी वाहने चालविणे किंवा रस्त्यावर पार्क करणे बेकायदेशीर ठरणार आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील वाहतूक विभागाला डिझेलवर चालणार्‍या पंधरा वर्षांपूर्वीच्या १ लाख ९१ हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी रात्री उशिरा वाहतूक विभागाने या १ लाख ९१ हजार वाहनांनी यादी वाहतूक पोलिसांना पाठविल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकार्‍याने दिली. त्या यादीत वाहनाचे नाव, वाहनधारकाचे नाव, नोंदणी क्रमांक आणि पत्त्याचाही समावेश आहे. तसेच त्या यादीत संबंधित वाहन कोणत्या वाहतूक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंद केलेले आहे, त्याचीही माहिती आहे.
आतापर्यंत १ लाख ९१ हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ही वाहने कायद्याने रस्त्यावर चालविता येणार नाहीत. तसेच या वाहनांचे रस्त्यावर पाकिर्र्ंगसुद्धा करता येणार नाही. एवढेच नव्हे तर १० ते १५ वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणार्‍या सर्वच वाहनांची यादी तयार करण्यात आली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आले की या वाहनांची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. वाहतूक विभागाने नोंदणी रद्द झालेली पंधरा वर्षांपूर्वीची वाहने पार्क करण्यासाठी २१ ठिकाणे उपलब्ध करून दिली आहेत. सद्यस्थितीत या २१ ठिकाणांवर एकावेळी प्रत्येकी साधारण १०००-१२०० वाहने लावण्याची सुविधा आहे. त्यामुळे विभागाने या कामासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google