Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्ली तर आधीपासूनच प्रदूषित

दिल्ली तर आधीपासूनच प्रदूषित

=केजरीवाल यांनी हात झटकले=
kejriwal1नवी दिल्ली,  [६ नोव्हेंबर] – श्‍वास गुदमरून टाकणारे प्रदूषण आणि दाट धुक्यामुळे दिल्लीकर गेल्या अनेक दिवसांपासून बेजार झाले असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सवयीप्रमाणे हात झटकत, दिल्ली तर फार आधीपासून सर्वाधिक प्रदूषित शहर आहे, असा तर्क सादर केला. सोबतच, यावर मात करण्यासाठी आपले सरकार काही पावले उचलत असून, यामुळे प्रदूषणावर आळा घालणे शक्य होईल, असे सांगितले.
केंद्रीय हरित लवादाने शनिवारी केजरीवाल सरकारला प्रदूषणाच्या मुद्यावरून चांगलेच हासडल्यानंतर केजरीवाल यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी लोकांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला. उद्यापासून तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देताना आवश्यकता भासल्यास पुन्हा सम-विषम फार्म्युला राबविण्याचे संकेतही दिले.
आपल्या सरकारने काही तज्ज्ञांचे मत जाणून घेतले आहे. अनेकांशी चर्चा केली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आजपासून पाच दिवस सर्वप्रकारच्या इमारती उद्‌ध्वस्त करणार्‍या मोहीम आणि बांधकाम बंद राहील. उद्यापासून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याची फवारणी करण्यात येईल. डीजी सेट्स १० दिवसांसाठी बंद राहतील. आवश्यक तेवढेच सुरू राहतील. तथापि, मोबाईल टॉवर व रुग्णालयांना यातून वगळले जाईल. बदरपूर प्रकल्प दहा दिवसांसाठी बंद राहील. राख देखीलही त्या ठिकाणाहून नेण्यावर बंदी राहील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास परिसरातील अधिकार्‍यांवर कारवाई होईल. १० नोव्हेंबरपासून व्हॅक्यूम क्लिनिंग सुरू होईल. प्रत्येक रस्ता आठवड्यातून एकदा स्वच्छ केला जाईल. आगामी तीन दिवस सर्व शाळा बंद राहतील आणि लोकांशी शक्य तेवढे काम घरूनच करावे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google