Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दिवाळीत निघाले चिनी वस्तूंचे दिवाळे

दिवाळीत निघाले चिनी वस्तूंचे दिवाळे

=स्वदेशी अभियानामुळे विक्रीत ६० टक्के घट=
ban-chinaनवी दिल्ली, [३१ ऑक्टोबर] – भारतात दहशतवादी हल्ले करणार्‍या पाकिस्तानची पाठराखण करण्याच्या चीनच्या मानसिकतेमुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी दिवाळीत स्वदेशीचे अभियान चालवून चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे धोरण अंगिकारल्याचा मोठा फटका चीनला बसला. यंदाच्या दिवाळी चिनी वस्तूंच्या विक्रीत तब्बल ६० टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय बाजारपेठांना गृहीत धरणार्‍या चिनी उत्पादकांचे या दिवाळीने दिवाळेच काढल्याचे हे चित्र देशभरातच पाहायला मिळाले.
जम्मू-काश्मीरच्या उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर चीनने पाकची पाठराखण केली होती. त्यामुळे पाक व चीनविषयी भारतीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली होती. यातूनच देशभरात स्वदेशीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहभाग होत देशभरातच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला होता. सोशल मीडियावरही चिनी वस्तुंच्या विरोधात प्रखर मोहीम राबविण्यात आली होती.
सोशल मीडियावरील मोहिमेचा विशेष परिणाम दिसून आला. ग्राहकांसोबतच व्यापार्‍यांनीही चिनी बनावटीच्या वस्तुंच्या खरेदीत विशेष उत्साह दाखवला नव्हता. याचाच परिणाम म्हणून देशात तयार झालेल्या वस्तूंनाच नागरिकांकडून मागणी वाढली असल्याचे दिसून आले. देशात तयार झालेल्या मातीच्या वस्तू, कागदी व प्लॅस्टिकच्या वस्तूंना नागरिकांनी जास्त पसंती दिल्यामुळे चिनी बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीत तब्बल ६० टक्क्यांची घट झाली, अशी माहिती बाजारातील घडामोडींचे विश्‍लेषण करणार्‍या सूत्रांनी दिली.
चिनी बनावटीच्या वस्तूंऐवजी यावर्षी दिवाळीत देशभरात कागद, मातीच्या वस्तू, चॉकलेट, सुका मेवा, मिठाई, देशी उपकरणे, तसेच तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये तयार करण्यात आलेल्या फटाक्यांना ग्राहकांनी पसंती दिली. चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कारामुळे चीनचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठांवरही दबाव निर्माण झाल्याचे दिसून आले.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google