Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला दिलासा

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला दिलासा

♦धरणसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ
♦सरासरीच्या ९५.८ टक्के पाऊस, ८३ टक्के साठा
ujani-damमुंबई, [२५ ऑक्टोबर] – यंदा राज्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी सरासरीच्या ९५.८ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास सरासरीच्या ६० टक्के पाऊस पडला होता. या पावसामुळे भूजलपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, धरणसाठ्यामध्येही चांगली वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये ८३.५३ टक्के साठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच सुमारास तो ४२.४० टक्के इतका कमी होता. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे ठिकठिकाणची शिवारे जलयुक्त झाली आहेत.

जलाशयातील विभागनिहाय स्थिती

विभाग            यावर्षीचा साठा             गतवर्षीचा साठा
मराठवाडा      ७७.२५ टक्के               ५.५३ टक्के
कोकण          ९३.२२ टक्के                ५५.४७ टक्के
नागपूर           ६६.९७ टक्के               ४३.९९ टक्के
अमरावती       ७६.२६ टक्के               ४९.६४ टक्के
नाशिक          ८८.१७ टक्के                 ४६.५८ टक्के
पुणे                ८८.८९ टक्के                ५३ टक्के

२० जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस
सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि गडचिरोली या २० जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या १२ जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस तर, कोल्हापूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google