Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देश अखंड ठेवण्यात सरदार पटेल यांचे मोठे योगदान : पंतप्रधान

देश अखंड ठेवण्यात सरदार पटेल यांचे मोठे योगदान : पंतप्रधान

narendra-modi3नवी दिल्ली, [३१ ऑक्टोबर] – भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राष्ट्राने त्यांना आज भावपूर्ण आदरांजली वाहिली. पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संसद मार्गावरील सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी पटेल यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून आदरांजली वाहिली. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यावेळी उपस्थित होते.
रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देश अखंड ठेवण्यासाठी पटेल यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. देशात सहकार चळवळीचा पाया सर्वप्रथम पटेल यांनीच घातला याकडेही पटेल यांनी लक्ष वेधले. देशातील शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पटेल यांनी आपले आयुष्य वेचले, असे मोदी म्हणाले.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या दौडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवली. ‘सरदार पटेल अमर रहे’ची घोषणाही मोदी यांनी यावेळी दिली. आज संपूर्ण देश अखंड दिसतो, त्याचे संपूर्ण श्रेय सरदार पटेल यांचेच असल्याचे मोदी यांनी सांगितले. देश कमजोर करण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहे, अशाही स्थितीत देशाला एकसंध ठेवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील, असे मोदी म्हणाले.
देश मजबूत , शक्तिशाली आणि बलवान होण्यासाठी सरदार पटेल यांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यावर वाटचाल करावी लागेल, त्यासाठी आपल्याला देशात एकता ठेवावी लागेल, असे ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google