Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » दोन दिवसात १०० रुपयांच्या जादा नोटा : एसबीआय

दोन दिवसात १०० रुपयांच्या जादा नोटा : एसबीआय

state-bank-of-india-sbi-logoमुंबई, [९ नोव्हेंबर] – सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय स्टेट बँकेने देशभरातील आपल्या शाखांमध्ये आणि सर्व एटीएम्समध्ये शंभर रुपये मूल्याच्या मुबलक प्रमाणात नोटा आगामी दोन दिवसांतच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.
स्टेट बँक आणि तिच्या संलग्न बँकांचे देशात एकूण ५५ हजार एटीएम्स आणि सात हजार सीडीएम्समध्ये (कॅश डिपॉझिट मशिन्स) असून, यात एकट्‌या एसबीआयच्या १७ हजार शाखा आहेत. आमच्याजवळ शंभर रुपयांच्या भरपूर नोटा असून, देशभरातील सर्वच शाखांमध्ये आम्ही त्या उपलब्ध करीत आहोत. आगामी दोन दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google