Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » द. कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात वायग्रा गोळ्या

द. कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात वायग्रा गोळ्या

वृत्तसंस्था
सेऊल, २४ नोव्हेंबर
park-geun-president-s-koreaदक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन यांच्या कार्यालयात वायग्राच्या गोळ्या सापडल्याने त्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. विरोधी पक्षाच्या खासदाराने आरोप केल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने डिसेंबर महिन्यात वायग्रा गोळ्यांची खरेदी केल्याचे मान्य केले.
उंचावरील प्रदेशात गेल्यानंतर होणार्‍या आजारांसाठी या गोळ्यांची खरेदी करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन इथिओपिया, युगांडा आणि केनियाच्या दौर्‍यावर जाणार होत्या. या तीनही देशांच्या राजधान्या उंच प्रदेशात आहेत. त्यावेळी राष्ट्राध्यक्षांचे सहकारी व कर्मचार्‍यांना कुठलाही त्रास उदभवल्यास खबरदारी म्हणून या वायग्रा गोळ्या विकत घेण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या गोळ्यांचा वापर झालेला नाही, अशी माहिती ब्ल्यू हाऊसचे प्रवक्ते जंग युउन कुक यांनी दिली. दक्षिण कोरियातील डॉक्टर गिर्यारोहणासाठी जाणार्‍या गिर्यारोहकांना अनेकदा अशा प्रकारच्या वायग्रा गोळ्या लिहून देतात, असे जंग यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google