Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » धोरणांपेक्षा राजकारण मोठे नको

धोरणांपेक्षा राजकारण मोठे नको

=पंतप्रधानांचा सनदी अधिकार्‍यांना सल्ला=
narandra-modi-7नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – राजकारण धोरणांपेक्षा मोठे असू नये, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना दिला. सनदी अधिकार्‍यांच्या या नव्या तुकडीने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना अनेक मुद्यांवर मार्गदर्शन केले.
तुम्ही यापुढील आयुष्यात कोणत्याही पदांवर काम करा, त्यात संघिय भावना असणे आवश्यक आहे. आपल्या देशात राजकारणापेक्षाही धोरण महत्त्वाचे आहे. तेव्हा आपल्या निर्णय प्रक्रियेत दोन मापदंड ठेवा. तुमचा निर्णय राष्ट्रहितात नाही आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे गरीबातल्या गरीबाचे नुकसान होणार, याची काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
२०१४ च्या तुकडीतील या अधिकार्‍यांनी सहाय्यक सचिव म्हणून आपले तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आज मोदी यांची भेट घेऊन डीबीटी, स्वच्छ भारत, ई-कोर्ट, पर्यटन, आरोग्य आणि राज्यकारभारात सॅटेलाईटचा वापर यासह प्रशासनातील एकूण आठ मुद्यांवर सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाचे पंतप्रधानांनी कौतूक केले.
तुम्ही सर्वच आता केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव म्हणून रूजू होणार आहात. तुमच्या तरुण व्यक्तिमत्त्वाचा आणि अनुभवाचा फार मोठा लाभ सरकारला विविध योजना राबविताना होणार आहे. तुमच्या सादरीकरणावर मी समाधानी असून, विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्‍वास आहे, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google