Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » नक्षलवादावर शांतिपूर्ण तोडगा काढा

नक्षलवादावर शांतिपूर्ण तोडगा काढा

=सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश=
supreme_court_1नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – नक्षलवाद ही गंभीर समस्या असली, तरी त्यावर शांतिपूर्ण मार्गाने तोडगा काढण्यावरच केंद्र व राज्य सरकारचा भर राहायला हवा. नक्षलवादी आपल्याच देशाचे नागरिक असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यवहारिकच असावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील आपल्या गावात नक्षली कारवायांना विरोध करणार्‍या एका आदिवासी गावकर्‍याची अलीकडेच कू्ररपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापक नंदिनी सुंदर, जवाहलरलाल नेहरू विद्यापीठातील काही प्राध्यापक आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्वांविरोधात १५ नोव्हेंबरपर्यंत कोणतीही आक्रमक किंवा सुडबुद्धीने कारवाई करण्यात येणार नाही, अशी मौखिक हमी छत्तीसडगड सरकारने न्या. मदन लोकूर आणि न्या. आदर्श गोयल यांच्या दोन सदस्यीय न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिले.
पोलिसांनी गेल्या ७ नोव्हेंबर रोजी नंदिनी सुंदर, जेएनयूच्या प्राध्यापक अर्चना प्रसाद आणि इतरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. नक्षली समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार मदत करीत आहोत. पण, केंद्र आणि राज्य सरकार ही बाब गंभीरपणे घेत नाही. यावर तुम्ही शांततेतच तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्यावर किंवा अन्य कोणावरही दोष ठेवणार नाही. पण, जीवनाकडे तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारायलाच हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर आम्ही पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत आहोत, असे न्यायालयाने सांगितले. यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, नंदिनी सुंदर आणि इतरांविरोधात आमच्याजवळ सक्षम आणि ठोस पुरावे असून, आम्ही ते लवकरच न्यायालयात सादर करणार आहोत.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google