Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » नक्षलवाद्यांकडून जुन्या नोटा बदलण्यासाठी वृद्धांवर बळजोरी

नक्षलवाद्यांकडून जुन्या नोटा बदलण्यासाठी वृद्धांवर बळजोरी

=तरुणांसह महिलांचाही वापर=
वृत्तसंस्था
लातेहार, १६ नोव्हेंबर –
naxalझारखंडमधील नक्षलवाद्यांकडून ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी गावकर्‍यांचा वापर करण्यात येत आहे. तरुणांसह वृद्ध नागरिकांना यासाठी बळजोरी केली जात आहे.
खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही जबरदस्ती करण्यात येत आहे. खंडणीच्या माध्यमातून जमा झालेला पैशांची रद्दी होऊ नये म्हणून  नक्षलवाद्यांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती झारखंडमधील लातेहारचे पोलीस अधीक्षक अनुप बिर्थारे यांनी आज बुधवारी येथे दिली.
पोलिस अधिक्षक बिर्थारे म्हणाले, बँक खात्यात अडीच लाख रुपये जमा करू शकण्याच्या मर्यादेचा नक्षलवादी गैरवापर करीत आहेत. नक्षलवाद्यांकडून वापर केल्या जाणार्‍या गावकर्‍यांचा शोध घेण्याची मोहीम दोन दिवसांपासून सुरू आहे.  काही स्थानिक लोक नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार असू शकतात. आम्हाला या लोकांबद्दल संशय असून, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत.
नक्षलवाद्यांचा काळा पैसा बदलून तो पांढरा करणार्‍यांची माहिती आमच्याजवळ आहे. संबंधित लोकांवर आमची पाळत असून, जुन्या नोटांची वाहतूक करणार्‍या वाहनांचा तपासही आम्ही हाती घेतलेला आहे.
या प्रकारात काही गावकर्‍यांनीही माहिती दिली आहे. नक्षलवाद्यांकडे असणारी बेहिशेबी रक्कम घेऊन जनधन योजनेत पैसे जमा करायला आली होती.  तिच्याजवळ साडेचार लाख रुपयांची रक्कम होती. परंतु, आपल्याजवळ नेमकी किती रक्कम आहे, याचीही कल्पना तिला नव्हती. बँक अधिकार्‍यांनी पॅन कार्डची मागणी केल्यावर ही महिला पैसे जमा न करताच माघारी परतली.
मातलोंग या गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लतेहार जिल्ह्यातील बँकांमध्ये धाव घेतली आहे. ते लाखो रुपयांची रक्कम घेऊन बँकांमध्ये जात आहेत, अशी माहिती एका गावकर्‍याने दिली.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google