Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » नजीबच्या आईने घेतली राजनाथसिंहांची भेट

नजीबच्या आईने घेतली राजनाथसिंहांची भेट

=जेएनयूतील बेपत्ता विद्यार्थ्याचे प्रकरण=
rajnath-singh_11नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेला विद्यार्थी नजीब अहमदच्या आईने आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि नजीबचा शोध घेण्यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
जेएनयूमधील बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असलेला नजीब अहमद गेल्या १५ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. त्याचा शक्य तितक्या लवकर शोध घेण्यात यावा, अशी विनंती त्याची आई फतिमा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी राजनाथसिंहांसोबतच्या भेटीत केली.
राजनाथसिंह यांनी नजीबच्या परिवारातील सदस्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि नजीबचा शोध घेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जातील, अशी हमी दिली, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
मी  स्वत: दिल्ली पोलिसांना विशेष तपास पथक स्थापन करण्यास सांगितले आहे. मी देखील तपास कार्यावर लक्ष ठेवून आहो. आम्ही शक्य तितक्या लवकर नजीबला शोधून काढू, असेही राजनाथसिंह यांनी त्यांना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google