Home » गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » नववर्षापासून गोवा होणार ‘कॅशलेस’!

नववर्षापासून गोवा होणार ‘कॅशलेस’!

•सरकारी पातळीवर वेगाने काम सुरू
•देशातील पहिलेच राज्य,
वृत्तसंस्था
पणजी, २७ नोव्हेंबर –
cashless५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना कॅशलेस होण्याचा संदेश दिला आणि गोव्याने हा संदेश गंभीरपणे मनावर घेत, मावळत्या वर्षासोबतच रोखीच्या व्यवहारांनाही निरोप देण्याचा संकल्प सोडला. रोखीचे व्यवहार बंद करणारे अर्थात कॅशलेस होणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. १ जानेवारीपासून गोव्यातील नागरिक मोबाईलच्या एका क्लिकवर भाजीपाल्यापासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंची सहज खरेदी करू शकणार आहेत.
गोव्याला कॅशलेस करण्याच्या योजनेवर सरकारी पातळीवर वेगाने काम सुरू झाले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत याबाबतची तयारी पूर्ण झाली असेल. तोपर्यंत गोव्यात रोखीनेच सर्व व्यवहार होणार आहेत. तथापि, कॅशलेस योजना लागू झाल्यानंतर ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर लगेच त्यांच्या बँक खात्यातून तेवढ्या रकमेची कपात होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी दिली.
गोवेकरांनी कॅशलेस व्हावे, यासाठी उद्या सोमवारपासूनच विक्रेते, लहान दुकानदार आणि ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व्यापक अभियान उघडण्यात येणार आहे. या उद्देशासाठी बँकेत नोंदणी करणार्‍या प्रत्येक विक्रेत्याला एमआय क्रमांक दिला जाणार आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी देखील याच उद्देशासाठी काही वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस समाज निर्माण करण्याच्या स्वप्नाची पूर्तता करणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याचे संकेतही पर्रीकर यांनी दिले आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google