Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नवाज शरीफ यांच्या चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवाज शरीफ यांच्या चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

=पनामा लीक प्रकरण=
NAWAZ SHARIFइस्लामाबाद, [१ नोव्हेंबर] – पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर २ नोव्हेंबरचा त्यांचा इस्लामाबाद बंद मागे घेतला आहे. पनामा पेपर लीकमध्ये नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर पद्धतीने विदेशात कंपन्या सुरू केल्याचा आरोप आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने इम्रान खानच्या पाकिस्तान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांना आयोगाच्या गठनासंदर्भात आपापली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. जर या पक्षांमध्ये सहमती न झाल्यास सुप्रीम कोर्ट यासाठी अटी निश्‍चित करेल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. नवाज शरीफ यांनी दोन दिवसात उत्तर सादर करावे, असे निर्देशही पाकच्या सुप्रीम कोर्टाने दिले.
धन्यवाद दिन साजरा करणार इम्रान खान
सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आनंदित झालेल्या इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने बुधवारचा दिवस धन्यवाद दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बानी गला येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना इम्रान खान म्हणाला, ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत मला साथ दिली त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आता आपापल्या घरी परत जा आणि आराम करा, असेही इम्रान खानने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google