Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नव्या नोटांवरील निघणार्‍या शाईचा असा झाला खुलासा!

नव्या नोटांवरील निघणार्‍या शाईचा असा झाला खुलासा!

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
arun-jaitley2२००० रुपयांच्या नव्या नोटेचा गुलाबी रंग निघतो आहे. याबाबत सामान्य जनता शंकितही आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील अनेकानेक संदेश फिरत आहेत. परंतु, नेमके काय, याचा खुलासा कुठेच होत नव्हता. त्यामुळे काही पत्रकारांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना या संदर्भात स्पष्टच विचारणा केली. तेव्हा जेटली यांनी नोटेवरील उठावदार भागातील शाईबाबत सांगितले. त्यांनी रंग जाणार्‍या दोन हजारच्या नव्या नोटा नकली असल्याचे साफ फेटाळून लावले.
रंग का जातो, याबाबत पत्रकारांपुढे खुलासा करताना जेटली म्हणाले की, नोटांची छपाई करण्यासाठी दोन प्रकारची शाई वापरली जाते. एक शाई संपूर्ण नोटेच्या छपाईसाठी वापरली जाते व दुसरी शाई फक्त उठावदार छपाईसाठी (इन्टॅग्लिओ) वापरली जाते. दोन हजारच्या नव्या नोटेत महात्मा गांधींचे चित्र आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नरांची सही, यासाठी दुसर्‍या प्रकारची शाई वापरली आहे. या उठावदार भागातील शाई घासली तर ती  निघून येते.  मात्र, या खुलाशाने पत्रकारांचे समाधान होत नाही, हे बघून अरुण जेटलींनी तिथल्या तिथे एक प्रात्यक्षिक दाखविले.
उपस्थित पत्रकारांकडून जेटलींनी हजाराची एक जुनी व डॉलरचीही एक नोट मागविली. त्या नोटांवरील उठावदार भागावर हातरुमाल घासला. दोन्ही प्रकरणात नोटेचा रंग त्यांच्या हातरुमालावर उतरला होता. हे बघितल्यानंतर कुठे पत्रकारांचे समाधान झाले!

अफवा… अफवा…
या अशा अफवेसोबतच आणखी काही अफवा समाजात उठत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, नव्या नोटांमध्ये एक नॅनो चिप आहे, जी आयकर खात्याला डाऊनलोड करता येते.  आणखी एक अफवा पसरवली जात आहे. ती म्हणजे, आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेलांची पत्नी कानन आणि मुकेश अंबानींची पत्नी नीता या बहिणी आहेत. अरुण जेटलींनी या सर्व शुद्ध अफवा असल्याचे पत्रकारांना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google