Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नागरिकांनी आपले मत द्यावे : पंतप्रधान

नागरिकांनी आपले मत द्यावे : पंतप्रधान

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर
narendra-modi-and-bhutan-gaffeनोटाबंदीच्या निर्णयावर देशवासीयांनी ऍपच्या माध्यमातून आपले मत थेट माझ्यापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यासंदर्भात मी आपल्या नरेंद्र मोदी ऍपवर काही प्रश्‍न विचारले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात आपण सर्वांनीच सहभागी व्हावे आणि जास्त मूल्यांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या माझ्या सरकारच्या निर्णयावर आपले मत प्रामाणिकपणे नोंदवावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
या ऍपमध्ये ‘पंतप्रधान मोदी यांच्याशी शेअर करण्यासाठी तुमच्या मनात काही कल्पना किंवा नवीन विचार आहेत काय’, ‘भारतात मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, असे तुम्हाला ठामपणे वाटते काय’, ‘भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची समस्या कायमची संपुष्टात आणण्यासाठी आपण सार्‍यांनीच संघटित होऊन लढा द्यायला हवा, याविषयी तुमचे काय मत आहे’, तसेच ‘५०० आणि एक हजाराच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाशी आपण सहमत आहात काय,’ यासारखे प्रश्‍न विचारण्यात आले आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google