Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » निर्णय धक्कादायक : एनडीटीव्ही

निर्णय धक्कादायक : एनडीटीव्ही

=सर्वांचेच कव्हरेज सारखे, मगच आमच्यावर बंदी का?=
pathankot-attack_ndtv-indiaनवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] – पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तसंकलन प्रकरणी आमच्या हिंदी वाहिनीच्या प्रक्षेपणावर एक दिवस बंदी घालण्याचा सूचना व प्रसारण मंत्रालयाचा निर्णय धक्कादायकच आहे. या हल्ल्याच्या काळात बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्यांनी एकसारखेच कव्हरेज दिले होते. मग, केवळ आमच्यावर बंदी का घालण्यात आली, असा सवाल एनडीटीव्हीने केला आहे.
सरकारच्या बंदी आदेशामुळे आश्‍चर्य होत आहे. देशभरातील वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी दिलेले कव्हरेज एकसारखेच असतानाही सरकारने केवळ एनडीटीव्हीवर कारवाईचा बडगा उगारणे नक्कीच वेदनादायक आहे, असे एनडीटीव्हीने आपल्या वेबसाईटवर जारी निवेदनात म्हटले आहे.
पठाणकोट हल्ल्याचे अतिसंवेदनशील आणि अतिरिक्त प्रमाणात कव्हरेज दिल्याबद्दल एनडीटीव्ही हिंदी या वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण एक दिवस बंद ठेवण्याचे आदेश सूचना व प्रसारण मंत्रालयाने गुरुवारी दिले होते. त्यामुळे ९ नोव्हेंबरला एनडीटीव्ही हिंदीचे प्रसारण बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे.
या घडामोडीवर आपली प्रतिक्रिया देताना या वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, आम्ही सर्वच पर्यायांची चाचपणी करीत आहोत. इतरांच्या तुलनेत आमचे कव्हरेज संतुलित होते. आणिबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली होती. त्याच दिवसांची पुन्हा एकदा आठवण झाली आहे.
संपादक संघटनेची बंदी उठवण्याची मागणी
दरम्यान, प्रसारण संपादक संघटनेने या बंदी आदेशाचा निषेध करीत, एनडीटीव्हीवरील एक दिवसाची बंदी तातडीने उठविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. एनडीटीव्हीचे कव्हरेज खरोखरच इतरांपेक्षा वेगळे होते काय, याचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करू, तोपर्यंत हा बंदी आदेश मागे घेण्यात यावा, असे संघटनेचे मत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google