Home » अर्थभारत, ठळक बातम्या » निर्देशांकात ३४९ अंकांची घसरण

निर्देशांकात ३४९ अंकांची घसरण

=अमेरिकेतील निवडणुकीची चिंता=
stock-exchange-share-marketमुंबई, [२ नोव्हेंबर] – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांच्या पसंतीच्या असलेल्या हिलरी क्लिटंन यांच्यावर डोनॉल्ड ट्रम्प यांनी किंचित आघाडी घेतल्याच्या वृत्ताचा परिणाम आज बुधवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीचे सत्रच सुरू केल्याने मुंबई शेअर बाजारात ३४९ अंकांची घसरण झाली.
आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात सुमारे ३०० अंकांच्या घसरणीने झाली. दुपारपर्यंत घसरणीचे सत्र सुरू होते. भारतीय रुपयाही सकाळी १४ पैशांनी खाली आला होता. आज अमेरिकन फेडरल बँक आपल्या पतधोरणाचा आढावा घेणार असल्याने त्याकडेही गुंतवणूकदार लक्ष ठेवून होते. दिवसभराच्या या उलाढालीत शेअर बाजाराचा निर्देशांक ३४९.३९ अंकांनी खाली आला आणि २७,५२७.२२ या स्तरावर बंद झाला. २७ ऑक्टोबर रोजी निर्देशांक २७,५२९.९७ या स्तरावर होता. त्यानंतर प्रथमच निर्देशांकाने हा स्तर गाठला आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत निर्देशांकाने ६५ अंक गमावले होते.
५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्‍या निफ्टीमध्येही ११२.२५ अंकांची घसरण झाली. या बाजारातही विक्रीचेच सत्र सुरू होते. दिवसभराच्या उलाढालीनंतर आपल्या ८६०० च्या स्तरावरून खाली येत निफ्टी ८५१४ या स्तरावर बंद झाला.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under अर्थभारत, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google