Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » निवडणूक आयोगाला जादा अधिकार देण्यास नकार

निवडणूक आयोगाला जादा अधिकार देण्यास नकार

=पुन्हा प्रस्ताव पाठविणार=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –
election-commission-of-india-logoनिवडणूक आयोगाला जादा कायदेशीर अधिकार देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. मतदारांना लाच देण्याचे पुरावे आढळल्यास निवडणूक प्रक्रिया रद्द करता यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे केली होती.
निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी आयोगाला कायमस्वरूपी कायदेशीर अधिकार मिळावेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. याबाबत त्यांनी यावर्षीच जूनमध्ये कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते. निवडणुकीच्या काळात काळा पैसा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, हे पत्र पाठविण्यात आले होते.
निवडणूक आयोग मात्र, कायदा मंत्रालयाच्या उत्तरावर संतुष्ट नसून हा प्रस्ताव पुन्हा एकदा सरकारपुढे मांडण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले. कायदा मंत्रालयाने निवडणूक आयोगाला उत्तरादाखल पाठविलेल्या पत्रात अशा प्रकारचे अधिकार नाकारले आहेत. कायदा मंत्रालयाचे उपसचिव के. के. सक्सेना यांनी हे अधिकार देता येणार नाहीत, असे म्हटले आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यात नवे कलम समाविष्ट करावे, अशी मागणीही निवडणूक आयोगाने केली होती. याद्वारे मतदारांना लाच दिली जात असल्यास कायदेशीर कारवाई करता येणे निवडणूक आयोगाला शक्य होते.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google