Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नीती आयोगाची महाराष्ट्राच्या पाठीवर थाप

नीती आयोगाची महाराष्ट्राच्या पाठीवर थाप

=कृषी व्यवसायासाठी पूरक वातावरण=
niti-aayogनवी दिल्ली, [३१ ऑक्टोबर] – शेतकर्‍यांसाठी पोषक अशी धोरणे राबवून कृषी व्यवसायासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्राने देशात बाजी मारली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.
नीती आयोगाने आज सोमवारी याबाबतचा अहवाल दिला आहे. ‘कृषी विपणन आणि शेतकरीपूरक सुधारणा’ असे या अभ्यासाचे नाव असून, कृषी क्षेत्रात राज्यांनी राबविलेल्या सुधारणा कार्यक्रमांच्या आधारावर तो तयार करण्यात आला आहे.
शेतकर्‍यांसाठी विविध प्रकारचे सुधारणा कार्यक्रम राबविणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने विपणन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली असून, देशभरातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृषी व्यवसाय करण्यासाठी सर्वाधिक पूरक वातावरण याच राज्यात असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात नमूद आहे.
बंगाल, उत्तरप्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीरसह देशातील किमान दोन तृतीयांश राज्यांनी कृषी क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी पाहिजे तसे कार्यक्रम राबविले नाहीत. त्याचप्रमाणे, कृषी विपणन धोरण अद्यापही न राबविणार्‍या बिहार, केरळ आणि मणिपूर यासारख्या राज्यांना यादीत स्थान देण्यात आले नाही.
नीती आयोगाने आपल्या अहवालात महाराष्ट्राला पहिले, गुजरातला दुसरे आणि राजस्थानला तिसरे स्थान देतानाच, मध्यप्रदेशला चौथ्या स्थानावर टाकले आहे. त्यानंतर अनुक्रमे हरयाणा, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांचा क्रमांक लागतो.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google