Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » नोटबंदीचा निर्णय भाजपावरच उलटेल

नोटबंदीचा निर्णय भाजपावरच उलटेल

=कपिल सिब्बल यांचे मत=
वृत्तसंस्था
लखनौ, २८ नोव्हेंबर –
kapilsibalउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून केंद्रातील भाजपा सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाची अतिशय सुमार अंमलबजावणी झाल्याने हा निर्णय भाजपावरच उलटणार असल्याचे मत कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज सोमवारी येथे व्यक्त केले.
नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना जो त्रास सहन करावा लागत आहे, त्याचा राजकीय फायदा कॉंगे्रसलाच मिळणार आहे, असे सिब्बल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
आपण जर केवळ उत्तरप्रदेश निवडणुकीपुरता विचार केला, तर भाजपाचे फार मोठे नुकसान होणार आहे आणि कॉंगे्रसच्या मतांमध्ये वाढ होणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नोटबंदीचा निर्णय हा आर्थिक विचारातून नव्हे, तर केवळ विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून, राजकीय विचारातून घेण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारने अतिशय घाईगर्दीत हा निर्णय घेतला. सर्वसामान्यांना त्रास होईल, याची माहिती असताना देखील निर्णयाचे योग्य नियोजन करण्यात आले नाही आणि पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नाही. हा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्र्यांना देखील अंधारात ठेवण्यात आले होते.  या निर्णयाने देशभरात गोंधळ उडाला आहे, असेही सिब्बल म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google