Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » नोटबंदीचा मोदींचा निर्णय धाडसीच

नोटबंदीचा मोदींचा निर्णय धाडसीच

=नितीशकुमार यांचे प्रतिपादन, ठोस व्यवस्थेअभावी सामान्यांना त्रास=
वृत्तसंस्था
पाटणा, २५ नोव्हेंबर –
nitish_kumar1५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अतिशय धाडसी असाच आहे, असे पुन्हा एकदा स्पष्ट करताना, केवळ त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस व्यवस्था करण्यात न आल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास करावा लागला, ही सत्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मान्य केली.
नोटबंदीच्या मुद्यावरून बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीत संभ्रमाचे किंवा विरोधभासाचे वातावरण असल्याच्या वृत्ताचेही नितीशकुमार यांनी खंडण केले. नोटबंदीचा मोदी यांचा निर्णय साहसी आहे आणि यामुळे काळा पैसा व भ्रष्टाचारविरोधी लढा आणखी मजबूत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने जर नोटबंदीच्या निर्णयाला बेनामी संपत्तीविरुद्ध कठोर पावले उचलून देशात दारूबंदी जाहीर करण्याची जोड दिली, तर काळ्या पैशाविरोधातील हा लढा आणखी परिणामकारक ठरू शकतो, असे मतही कुमार यांनी व्यक्त केले.
सरकारने जर नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना पुरेशा प्रमाणात चलनाची व्यवस्था अपलब्ध केली असती, तर आज लोकांना जो त्रास होत आहे, तो झाला नसता. प्रत्येकच मोठ्या निर्णयात काही प्रमाणात उणिवा राहात असतात. हा निर्णयही अपवाद नाही. असे असतानाही मी या निर्णयाचे समर्थन करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google