Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नोटबंदी आढाव्यासाठी केंद्राचे पथक देशभरात जाणार!

नोटबंदी आढाव्यासाठी केंद्राचे पथक देशभरात जाणार!

=महाराष्ट्रात येणार तीन अधिकार्‍यांची तुकडी=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर –
dopt-gov-of-india५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर, देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता केंद्र सरकारने आपले विविध अधिकारी  आणि कर्मचारी यांना देशभरातील विविध राज्यांत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन हे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्षात पाहणी करणार आहेत. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने केंद्रातील अतिरिक्त सचिवांसह संयुक्त सचिव आणि उपसचांलक पदावर कार्यरत असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांची या मोहिमेसाठी निवड केली आहे.
अधिकार्‍यांच्या तुकडीची तीन प्रकारे रचना करण्यात आली आहे. पहिल्या तुकडीत तीन, दुसर्‍या तुकडीत दोन आणि तिसर्‍या तुकडीत प्रत्येकी एका अधिकार्‍याचा समावेश राहणार आहे.
तीन अधिकार्‍यांची तुकडी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बंगाल, हिमाचल प्रदेश, ओडिशा, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि पंजाबचा दौरा करणार आहे. दोन सदस्यांचा समावेश असणारी तुकडी गोवा, तेलंगणा, केरळ, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड, आणि आसाम या राज्यांची पाहणी करणार आहे. तर, एक अधिकारी असणार्‍या तुकडीकडे नागालँड, मिझोराम, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, अंदमान आणि निकोबार, लक्ष्यद्वीप, पुद्दूचेरी आणि सिक्किम या राज्यांचा समावेश आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) दिलेल्या माहितीनुसार, या दौर्‍याचे वेळापत्रक केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे ठरविण्यात येणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google