Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नोटाबंदीमुळे विकासदर कमी होण्याची शक्यता

नोटाबंदीमुळे विकासदर कमी होण्याची शक्यता

=तज्ज्ञांचे मत=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर –
money-india५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णयामुळे काळा पैसा आणि नकली नोटांवर आळा घालण्यासाठी उपयुक्त असला, तरी या निर्णयाचा देशाच्या आर्थिक विकासदरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अलीकडील काळात भारताने आर्थिक विकासात चीनलाही मागे टाकले होते. पण, नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होणार असला, तरी चलनातील नोटा कमी होणार असल्याने त्याचा थेट फटका विकासाच्या गतीला बसेल आणि देशाच्या आर्थिक विकासाचा दर सात टक्के किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असे या अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचार्‍यांचा वाढलेला पगार आणि महागाई भत्ता तसेच यावर्षी मान्सून चांगला राहिल्यामुळे देशाचा विकासदर ८ टक्क्यांवर जाईल, अशी आशा होती. मात्र नोटाबंदीमुळे चलनातून तब्बल ८६ टक्के रोकड बाद झाली आहे. आर्थिक विकास दर घटण्याचेच हे संकेत आहेत, याकडे या तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, विकासदरावर फटका बसणार असला तरी, तो फार मोठा राहणार नाही. तर, काहींच्या मते विकास दर अर्ध्या टक्क्याने कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भारत ही जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. नोटाबंदीचा परिणाम आगामी सहा महिनेपर्यंत राहणार असून, त्यानंतर अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी हाच निर्णय हितकारक ठरेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google