Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » नोटाबंदीवर स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नोटाबंदीवर स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

=लोकांची गैरसोय टाळण्यासाठी उपायांची विचारणा=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर –
supreme_court_2चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी स्पष्ट नकार दिला. तथापि, नव्या नोटा प्राप्त करताना नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी काय उपाय केले, अशी विचारणा न्यायालयाने केंद्राला केली आहे.
केंद्राच्या निर्णयावर आम्ही कोणत्याही प्रकारची स्थगिती देणार नाही, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या दोन सदस्यीय न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयावर स्थगिती घालणे अनिवार्य आहे, अशी विनंती करणारी याचिका काही वकिलांनी दाखल केली होती.
एका याचिकाकर्त्याच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की, याबाबतच्या अधिसूचनेवर बंदी घालावी, अशी विनंती मी करणार नाही. पण, लोकांना जो त्रास होत आहे, तो दूर करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत काय, याचे उत्तर सरकारकडून प्राप्त करण्यात यावे. यानंतर न्यायालयाने ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना सरकार आणि आरबीआयने भविष्यात लोकांना असा त्रास होणार नाही, यासाठी योजलेल्या पावलांची माहिती देणारे शपथपत्र सादर करा, असे आदेश दिले आणि केंद्र सरकारला कोणतीही नोटीस जारी न करता, या प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी करण्याचे निश्‍चित केले.
या प्रकरणावरील अल्प सुनावणीत सरन्यायाधीश म्हणाले की, जास्त मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचेच दिसून येत आहे. पण, यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय देखील होत आहे. काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा तुम्हाला (केंद्र सरकार) अधिकार आहे. पण, हा स्ट्राईक नागरिकांविरोधात नसावा.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google