Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » नोटा नाही, पंतप्रधानच बदलवा

नोटा नाही, पंतप्रधानच बदलवा

=केजरीवालांचा टिवटिवाट=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –
kejriwalमोठ्या मूल्यांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा थयथयाट संपायचे नावच घेत नाही. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीका करताना, आता चलनी नोटा नाही, तर पंतप्रधान बदलवायला हवा, असे ट्विट केले आहे.
नोटांवर बंदी आणण्याच्या निर्णयामुळे पेटीएमचाच जास्त फायदा झाला आहे, असे सांगत मोदी आणि पेटीएम यांच्यात काय संबंध आहे, याचा खुलासा करण्याची मागणी केजरीवालांनी केली आहे. केजरीवालांनी यापूर्वी, नोटाबंदी म्हणजे आठ लाख कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, केजरीवालांच्या या नव्या टिवटिवाटावर नेटिझन्सकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदी यांना बदलविण्याची मागणी करणार्‍या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाच आता बदलण्याची वेळ आली आहे, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपलोड होत आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google