Home » ठळक बातम्या, फिचर, राष्ट्रीय, संरक्षण » नौदलाच्या पाणबुडीवरील संकट आता त्वरित कळणार!

नौदलाच्या पाणबुडीवरील संकट आता त्वरित कळणार!

♦समुद्राच्या आतील टेहळणी अधिक सुकर
♦मेड इन इंडिया ‘सोनार’ प्रणालींचे लोकार्पण,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर –
sonar-sound-navigation-and-rangingभारतीय नौदलाची कुठलीही पाणबुडी संकटात सापडल्यास आता  त्वरित माहिती प्राप्त होऊ शकणार आहे. ही माहिती देणार्‍या आणि समुद्राच्या आत कार्य करणार्‍या चार महत्त्वाच्या ध्वनि नौसंचालन आणि शोध कार्य प्रणालींचे  (‘सोनार’ साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग) लोकार्पण आज गुरुवारी नौदलास करण्यात आले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा झाला.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने या चार ‘सोनार’ प्रणाली नौदलास सुपुर्द केल्यात. या चारही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी चार प्रणाली नौदलास प्राप्त होणे, ही महत्त्वाची बाब मानली जात असून यांचे निर्माण ‘मेड इन इंडिया’ आहे, हे विशेष.
समुद्राच्या आतील टेहळणी करणे यामुळे अधिक सुकर झाले आहे. समुद्राच्या आतील भागात किंवा पृष्ठभागावर काही संशयास्पद हालचाल दिसल्यास, वा कुठली वस्तू आढळल्यास ध्वनिलहरींच्या साहाय्याने त्याचा शोध घेणे हे कार्य या चारही प्रणाली करणार आहेत.
या चारही प्रणाली डीआरडीओच्या कोची येथील संशोधनशाळेत विकसित करण्यात आल्या आहेत. नौदलास सुपुर्द करण्यात आलेल्या चार ‘सोनार’ प्रणालींमध्ये अभय, हमसा, नॅक्स आणि आयड्‌स यांचा समावेश आहे.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under ठळक बातम्या, फिचर, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google