Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » न्यायाधीशांच्या ७७ पैकी ३४ नावांना मंजुरी

न्यायाधीशांच्या ७७ पैकी ३४ नावांना मंजुरी

=केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती=
supreme-court_6नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्याकरिता निवड मंडळाने ज्या ७७ नावांची शिफारस केली होती, त्यातील ३४ नावांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती केंद्र सरकारने आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. शिव कीर्ती सिंह आणि न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या तीन सदस्यीय न्यायासनापुढे सरकारने असेही स्पष्ट केले की, न्यायाधीशांच्या नियुक्तीवरील शिफारसीसंदर्भात कोणतीही फाईल आता सरकारकडे प्रलंबित नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळाने आमच्याकडे एकूण ७७ न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस असलेल्या फाईल्स पाठविल्या होत्या. त्यातील ३४ नावांना आम्ही मंजुरी दिली असून, उर्वरित ४३ नावांच्या फाईल्स पुनर्विचारासाठी निवड मंडळाकडे पाठविण्यात आली आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित राहिलेले ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने गेल्या ३ ऑगस्ट रोजी ‘मेमोरँडम ऑफ प्रोसिजर’चा नवा मसुदा विचारार्थ निवड मंडळाकडे पाठविला होता. पण, त्यावर मंडळाची कोणतीही प्रतिक्रिया सरकारला अद्याप प्राप्त झाली नाही, याकडेही रोहतगी यांनी लक्ष वेधले. याच अनुषंगाने येत्या १५ नोव्हेंबर रोजी सरकारने सरन्यायाधीश आणि चार वरिष्ठ न्यायमूर्तीं समावेश असलेल्या निवड मंडळाची बैठक बोलावली आहे. यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणीसाठी १९ नोव्हेंबर ही तारीख निश्‍चित केली.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google