Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » पंतप्रधानांच्या माफीच्या मागणीवरून राज्यसभेत गदारोळ

पंतप्रधानांच्या माफीच्या मागणीवरून राज्यसभेत गदारोळ

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
rajyasabhaनोटबंदीच्या मुद्यावरून आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधक आक्रमकपणे करत होते. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उपस्थित होते. अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. विरोधी पक्ष काळ्या पैशाच्या समर्थनात नाही, मात्र नोटबंदीच्या निर्णयाची ज्यापद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली, ती शहाणपणाची नाही, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले. विरोधी पक्ष काळ्या पैसेवाल्यांच्या बाजूने आहेत, असा आरोप बाहेर करत पंतप्रधान मोदी यांनी समस्त विरोधी पक्षांचा अपमान केल्याचा आरोप आझाद यांनी केला.
नोटबंदीच्या मुद्यावर होणार्‍या चर्चेच्या वेळी सभागृहात उपस्थित राहून पंतप्रधान मोदी यांनी विरोधी सदस्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि त्याला उत्तर द्यावे, असे आझाद पुढे म्हणाले. आझाद यांनी केलेले आरोप शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि कायदा आणि न्याय मंत्री रविशंकरप्रसाद यांनी खोडून काढले. नोटबंदीच्या मुद्यावर सभागृहात १६ नोव्हेंबरला सुरू झालेली चर्चा पुढे सुरू राहावी, अशी भूमिका नायडू यांनी मांडली. नोटबंदीच्या निर्णयामुळे पगारदार वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे बसपाच्या मायावती म्हणाल्या. नोटबंदीच्या मुद्यावर विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचे नैतिक बळ पंतप्रधान मोदी यांच्यात नाही, असे त्या म्हणाल्या.
नोटबंदीच्या मुद्यावर संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट असल्याचे तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओ ब्रायन म्हणाले. नोटबंदीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी जदयुचे शरद यादव यांनी केली. या मुद्यावर कॉंग्रेस आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये न येता आपल्या जागेवर अभे होत पंतप्रधानांनी माफी मागावी, अशा घोषणा सुरू केल्या. प्रत्युत्तरात भाजपाचे सदस्यही आपल्या जागेवर उभे होत घोषणा देऊ लागले, त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हा सारा प्रकार शांतपणे बसून पाहात होते. अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी सदस्यांना शांत करण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी प्रारंभी दहा मिनिटांसाठी आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google