Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा निर्णय देशहिताचाच!

पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा निर्णय देशहिताचाच!

♦मॉरिशस पंतप्रधानांनी केली प्रशंसा
♦भारताच्या अर्थव्यवस्थेला वाचविण्याचे कार्य केले
वृत्तसंस्था
पणजी, १६ नोव्हेंबर –

The Prime Minister, Shri Narendra Modi and the and Prime Minister of Mauritius, Sir Anerood Jugnauth at the One to One meeting, in Mauritius on March 11, 2015.

५०० व हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांनी आज बुधवारी येथे प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी योग्य तोच निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारताच्या लोकशाहीसाठीही दीर्घकालीन हिताचा ठरणार आहे, या शब्दात मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मोदी यांची प्रशंसा केली. उत्तर गोवा भागातील सालीगाव येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
पंतप्रधान जगन्नाथ म्हणाले, लोकांना काही अडचणी जाणवू शकतात, मात्र, मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला वाचविण्याचे कार्य केले आहे, हे जनतेच्या दीर्घ काळाने लक्षात येईल. मॉरिशसचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. भारतासोबत तर मॉरिशचा विशेष स्नेह आहे. भारत-मॉरिशस यांचे रक्ताचे नाते आहे, असे वर्णन यावेळी पंतप्रधान जगन्नाथ यांनी केले. भारत आम्हाला नेहमीच सहकार्य करीत आलेला असून यापुढेही हे सहकार्य कायमच राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google