Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी जपानला रवाना

पंतप्रधान मोदी जपानला रवाना

modi-air_india1नवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, १० नोव्हेंबर रोजी तीन दिवसांच्या जपान दौर्‍यासाठी रवाना झाले. या दौर्‍यात भारत व जपान दरम्यान नागरी अणुकरारावर स्वाक्षर्‍या होण्याची शक्यता असल्याने याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षा या विषयांवरही करार होण्याचे संकेत आहेत. पंतप्रधान या नात्याने मोदींचा हा दुसरा जपान दौरा आहे. गतवर्षी मोदींनी शिखर परिषदेत सहभाग नोंदवत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली होती.
आपल्या जपान दौर्‍यात पंतप्रधान अतिवेगवान बुलेट ट्रेनने कोबे येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टीने मोदींच्या या प्रवासाकडे पाहिले जात आहे. तसेच कोबे येथील प्रख्यात कावासाकी भारी उद्योग परिसरालाही पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google