Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी शुक्रवारी जपान दौर्‍यावर

पंतप्रधान मोदी शुक्रवारी जपान दौर्‍यावर

=ऐतिहासिक अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी होणार=
narendra-modi19टोकिया, [६ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी जपानच्या दोन दिवसीय दौर्‍यावर जाणार असून, त्यांच्या या भेटीत दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे.
भारत आणि जपानमधील आर्थिक व सुरक्षा संबंध आणखी बळकट करणे, यावर पंतप्रधान मोदी यांचा भर राहणार आहे. दोन्ही देशांमधील अणुसहकार्य करारामुळे अमेरिकेतील बड्या उद्योगांनाही भारतातील अणुप्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
जपानचे पंतप्रधान शिंझो आबे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत भेटीवर आले होते. त्याचवेळी अणुसहकार्य करारावर व्यापक मतैक्य झाले होते. तथापि, काही मुद्यांवर तोडगा निघू न शकल्याने करारावर स्वाक्षरी होऊ शकली नव्हती. या वर्षभराच्या काळात कराराच्या मार्गातील सर्वच अडथळे दूर झाले असून, पंतप्रधानांच्या आगामी जपान भेटीत स्वाक्षरीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे, असे वृत्त जपानमधील आघाडीच्या दैनिकाने आज रविवारच्या अंकात प्रकाशित केले आहे.
हा करार झाल्यानंतर जपान भारताला अण्वस्त्र तंत्रज्ञान निर्यात करू शकणार आहे. भारताने अण्वस्त्र प्रचारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसली, तरी या करारामुळे जपानकडून अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्राप्त करणारा भारत पहिलाच देश ठरणार आहे, हे विशेष!

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google