Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पगाराचा दिवस, पण बँकांमध्ये पैसाच नाही!

पगाराचा दिवस, पण बँकांमध्ये पैसाच नाही!

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –
rbi-buldingनोटबंदी निर्णय घेऊन आज बुधवारी २२ दिवस पूर्ण झाले आहेत. देशभरातील बँका आणि एटीएमवर लोकांची गर्दी अजूनही पाहायला मिळत असतानाच, आज सरकारी कर्मचार्‍यांचा पगार आणि निवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन जमा होण्याचा दिवसही आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पाहिजे तेवढी रक्कम उपलब्ध झाली नसल्याने वेतन व पेन्शन कसे जमा करायचे, हा मोठा प्रश्‍न देशभरातील बँकांना पडला आहे.
आरबीआयकडून अद्याप इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचा दावा बँकांनी केला आहे. पगाराच्या काळात एटीएम किंवा बँकेतून लोकांना त्यांची गरज भागविण्याइतके पैसे देण्यासही अडचणी जोत असल्याचे बँक अधिकार्‍यांचे मत आहे. आपला पगार आज नियमानुसार जमा होईल, या अपेक्षेने कर्मचारी व पेन्शनधारकांनी आज दुपारनंतर बँका व एटीएमबाहेर रांगा लावल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले होते.
बँकांकडून एका एटीएममध्ये एकावेळी ४४ लाख रुपये भरता येतात. मात्र चलनाचा तुटवडा असल्याने एटीएममध्ये कमी रक्कम भरली जात आहे. त्यामुळे एटीएममधील रक्कम लवकर संपत आहे. एटीएम पुन्हा भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे पगाराच्या दिवसात लोकांची अडचण होण्याची शक्यता बँकांनी वर्तवली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google