Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » पाककडे १४० अण्वस्त्रे, एफ-१६सुद्धा हल्ल्यासाठी सज्ज

पाककडे १४० अण्वस्त्रे, एफ-१६सुद्धा हल्ल्यासाठी सज्ज

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १९ नोव्हेंबर –
bulletin-of-the-atomic-scientistsपाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवित आहे. पाकिस्तानने आक्रमणासाठी सुमारे १३० ते १४० अण्वस्त्रांचा साठा केला असून, अण्वस्त्र आक्रमण करण्यास सक्षम अशा एफ-१६ सह काही लढाऊ विमानांना सुसज्ज केले आहे, असा दावा बुलेटिन ऑफ ऍटॉमिक सायंटिस्टस्‌ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून केला आहे.
उपग्रह छायाचित्राच्या माध्यमातून पाकिस्तानच्या सैन्य छावण्या आणि वायुसेनेच्या ठिकाणांचे छायाचित्र मिळाले असून, या छायाचित्रांचे मोठ्या प्रमाणात विश्‍लेषण करण्यात आले आहे. यात मोबाइल लॉन्चर आणि भूमिगत सुविधा दृष्टीस पडत असून त्या सुविधा अण्वस्त्रांशी संबंधित असू शकतात, असे हंस एम. क्रिस्टेंसेन व रॉबर्ट एस. नोरिस यांनी लिहिलेल्या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानी अण्वस्त्र बळ २०१६बाबत या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानने आणखी काही शस्त्र व अधिक क्षमतेच्या तंत्रप्रणालींसह आपले अण्वस्त्र वाढविणे कायम ठेवले आहे. अण्वस्त्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे उत्पादन करणार्‍या उद्योगाला पाकिस्तान प्रोत्साहन देत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानकडे आता १३० ते १४० अण्वस्त्रांचा साठा आहे, असा आमचा अंदाज असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. चार प्ल्यूटोनियम उत्पादन रिऍक्टर आणि याचे दोन यूरेनियम संवर्धन सुविधांच्या विस्ताराने पाकिस्तानच्या शस्त्रसाठ्यात पुढील १० वर्षांत आणखी वाढ होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सुमारे ३५० शस्त्रसाठ्यासह आता पुढील दहा वर्षांत पाकिस्तान जगातील तिसरा सर्वाधिक अण्वस्त्र असणारा देश होईल, असे म्हणणे एखाद्या गोष्टीला चढवून सांगितल्यासारखे आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google