Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

पाकचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

=एक दहशतवादी ठार, भारतीय जवान शहीद=
kashmirश्रीनगर, [१० नोव्हेंबर] – पाकिस्तानी लष्कराच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला. यामुळे मागील ४८ तासांत हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या तीन झाली आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ लष्कराने आज गुरुवारी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत एक दहशतवादी मारला गेला. मागील काही दिवसांपासून प्रत्यक्ष ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून आणि दहशतवाद्यांकडून आगळीक सुरूच आहे. बारामुल्लाच्या रामपूर परिसरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असणार्‍या माछील आणि केरान भागातील चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे.
काल रात्रीपासून सुरू असलेला गोळीबार सकाळपर्यंत सुरू होता. या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google