Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » पाकच्या गोळीबारामुळे सीमेवरील २०० शाळा बंद

पाकच्या गोळीबारामुळे सीमेवरील २०० शाळा बंद

jammu-kashmir-map-6जम्मू, [२ नोव्हेंबर] – नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर लोकवसाहती व भारतीय जवानांच्या तळांवर पाकिस्तानच्या सैनिकांकडून सातत्याने सुरू असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या मार्‍यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीमावर्ती भागातील सुमारे २०० शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाने घेतला आहे.
काश्मीर खोर्‍यातील उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी गेल्या महिन्यात नियंत्रण रेषा पार करून गुलाम काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक केले होते. तेव्हापासून सीमाभागात तणावाचे वातावरण असून, पाकचे सैनिक या भागात सातत्याने गोळीबार करीत आहेत. या गोळीबारात अनेक भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीमाभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्मू विभागातील १७४, तर सांबा विभागातील ४५ शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असा शासकीय आदेश आज जारी करण्यात आला, अशी माहिती जम्मूच्या उपायुक्त सिमरन दीप सिंह यांनी दिली. हे आदेश सर्व शासकीय आणि खाजगी शाळांसाठी बंधनकारक आहे. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या खौर, जौरियान, मारहा, आर. एस. पुरा, अर्निया, मंडाल, माखवाल, अखनूर, बिस्हानाह आणि मिरान साहिब या भागातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google